Amaravati Crime | अमरावतीत मनोरुग्ण युवतीवर अत्याचार :  File Photo
अमरावती

Amravati Crime | अमरावतीत मनोरुग्ण युवतीवर अत्याचार : संशयितास पोलिसांनी केले तात्काळ जेरबंद

शिरखेड पोलीस ठाणे हद्दीतील एका गावात घटना, परिसरात संतापाची लाट

पुढारी वृत्तसेवा

अमरावती, :जिल्ह्यात शिरखेड पोलीस ठाणे हद्दीतील एका गावात घडलेल्या घटनेने संतापाची लाट उसळली आहे. २२ वर्षीय मनोरुग्ण युवतीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून, पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.

पीडिता ही मानसिक आजाराने ग्रस्त असून, ती गावात आपल्या वृद्ध आजी-आजोबांसोबत वास्तव्यास होती. ८ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास आरोपी संजय डोळस (वय ४३) याने तिला गावातील कोंडवाड्याच्या मागील निर्जन परिसरात नेले आणि तेथे तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. या घटनेदरम्यान पीडितेसोबत आरोपी असल्याचे दृश्य गावातील काही नागरिकांसह तिचे आजोबा आणि मामा यांच्या निदर्शनास आले.

संशय बळावल्याने कुटुंबीयांनी तात्काळ शिरखेड पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पीडितेच्या मामाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेतले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता अमरावती ग्रामीण पोलिसांचे फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले असून, पुरावे संकलनाची प्रक्रिया राबविण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अमरावती पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक दळवी, संजय वाघमारे व नितेश वाघ करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT