अमरावती, पुढारी वृत्तसेवा: नागपूर- मुंबई समृध्दी द्रुतगती मार्गावर एका चारचाकी वाहनाचे नियंत्रण सुटल्यामुळे अपघात होऊन आई, मुलगी व मुलगा हे तिघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी (दि.१८) धामणगाव तालुक्यातील नारगावंडी-सावळा दरम्यान घडली. (Accident on 'Smriddhi' Highway)
प्राप्त माहितीनुसार, एम. एच. २० ईजी- ९३३३ इनेवा क्रिस्टो या चार चाकी गाडीने संभाजीनगर येथील प्रशांत गुप्ता हे आपल्या कुटुंबीयांसोबत ताडोबा येथे जात होते. दरम्यान समृद्धी द्रुतगती मार्गावर चॅनल क्रमांक १०३-१०४ च्या मध्ये नारगावंडी- सावळा दरम्यान मुंबई-नागपूर लेनवर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील सारिका गुप्ता (३५), कंगना गुप्ता (१६) व राजवीर गुप्ता (१०) हे तिघेही गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये आई, मुलगी व मुलगा यांचा समावेश आहे. (Accident on 'Smriddhi' Highway)
जखमींना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र पुढील उपचारासाठी या सर्वांना अकोला येथील रुग्णालयात पाठविण्यात आले. अपघाता संदर्भात अधिक तपास ठाणेदार हेमंत ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तापूर पोलिस करीत आहेत. (Accident on 'Smriddhi' Highway)