Accident on Amravati-Nagpur highway
अमरावती- नागपूर महामार्गावर अकोला येथील सीआयडी अधिकाऱ्यांच्या वाहनाचा अपघात झाला.  Pudhari News Network
अमरावती

अकोला येथील सीआयडी अधिकाऱ्यांच्या वाहनाचा अपघात

पुढारी वृत्तसेवा

अमरावती, पुढारी वृत्तसेवा: अमरावती- नागपूर महामार्गावर अकोला येथील सीआयडी अधिकाऱ्यांच्या वाहनाचा गुरुदेव नगर ग्रामपंचायत जवळ अपघात झाला. ही घटना आज (दि. ९) दुपारी साडेबाराच्या दरम्यान घडली. या अपघातात सुदैवाने वाहनातील दोन अधिकारी व चालक सुखरूप बचावले. वाहनाचे स्टेरिंग रॉड तुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे.

Summary

  • अमरावती- नागपूर महामार्गावर अपघात

  • अकोला येथील दोन सीआयडी अधिकारी, चालक बचावले

  • वाहनाचे स्टेरिंग रॉड तुटल्याने हा अपघात

वाहन डिव्हायडरला धडकत विरुद्ध दिशेवर गेले

याबाबत सविस्तर वृत्त असे की, बोलेरो गाडी (एम एच 30 एच 459) या पोलीस वाहनाने अकोला येथील सीआयडी अधिकारी संदीप पाटील, सुरेश तेलमोरे व चालक सुखदेव नाईक हे आज दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास नागपूर हायकोर्टात महत्त्वाच्या कामानिमित्त जात होते. दरम्यान, अचानक अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील गुरुदेव ग्रामपंचायतीसमोर वाहनाच्या स्टेरिंगचा बॉईल जॉईंट तुटला व वाहन अनियंत्रित झाले. त्यानंतर वाहन हे डिव्हायडरला धडकत धडकत पाचशे मीटर समोर विरुद्ध दिशेवर पोहोचले.

सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.

तेवढ्यातच समोरून एक ट्रेलर (जड वाहन) येत होते. त्यावर पोलिसांचे वाहन धडकणार तोच ट्रेलर चालकाने समयसुचकता दाखवत स्वतःचे वाहन साईडला नियंत्रित केले. त्यामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. अपघाताची माहिती मिळताच तिवसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताची नोंद झाली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

SCROLL FOR NEXT