अल्पवयीन मुलीवर अत्याचार  file photo
अमरावती

अमरावती : अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन सामूहिक अत्याचार

करण शिंदे

अमरावती, पुढारी वृत्तसेवा: चांदूर येथे चौघांनी अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. संशयित आरोपींनी अल्पवयीन पीडित मुली सोबत अनैसर्गिक कृत्यही केल्याची प्राथमिक माहिती आहे. रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी अक्षय प्रकाश खांडे (वय.25), राजेश शंकर कोहळे (वय.30), काल्या उर्फ आकाश जगदीश पिल्लारे (वय.30), शिवाजी बंडू चौधरी (वय.27) या चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपींनी पीडित सोळा वर्षीय मुलीला दुचाकीवर बसवून चांदुर रेल्वे परिसरातील एका निर्जनस्थळी नेले. त्या ठिकाणी तिच्यावर सामुहिक अत्याचार करुन अनैसर्गिक कृत्य ही केले. तिने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी तिच्या डोळ्यात व तोंडात वाळू टाकली. तसेच तिला जीवे मारण्याचा प्रयत्नही केला.

पीडित मुलगी आरोपींच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घरी पोहोचली. या घटनेने ती मुलगी प्रचंड घाबरली होती. घडलेली संपूर्ण हकीकत तिने आपल्या कुटुंबीयांना सांगितली. त्यानंतर कुटुंबीयांनी पीडित मुलीसह चांदुर रेल्वे पोलीस ठाण्यात धाव घेऊन या घटनेची तक्रार शनिवारी (दि.6) नोंदविली. पोलिसांनी तत्काळ दखल घेत या प्रकरणी चार संशयित आरोपींना अटक केली आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT