अमरावती; पुढारी वृत्तसेवा : शहर पोलिस आयुक्तालयातील गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक २ च्या पथकाने दुचाकी चोरी प्रकरणात रॉकी गँगच्या प्रमुखासह दोघांना सोमवार, (दि २४) रोजी अटक केली. अजय उर्फ रॉकी भरत वाडेकर (वय १६) व मनोज पुरुषोत्तम मांगुळकर (२९, दोन्ही रा. कवठा बहाळे, भातकुली) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांच्या त्यांच्या ताब्यातून ९ दुचाकी जप्त केल्या आहेत.
कोंडेश्वर परिसरातील विटभट्टीवर राहणार्या आशिष सुमत इवने (वय २२) यांची दुचाकी (क्र. एमपी ४८ एनए १६७७) ही तपोवन गेटजवळील पुलावरून ९ फेब्रुवारी रोजी चोरी गेली. या घटनेच्या तक्रारीवरून गाडगेनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात गुन्हे शाखेचे युनिट क्रमांक २ चे पथकही गुन्ह्याचा समांतर तपास करीत होते.
दरम्यान पोलिस तपासात शहरातील दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांत रॉकी गँगचा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने रॉकी गँगचा प्रमुख अजय उर्फ रॉकी व मनोज या दोघांना वरूड येथून अटक केली. चौकशीत त्यांनी अमरावती शहर, अमरावती ग्रामीण, यवतमाळ, मध्यप्रदेश येथून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्यानुसार त्यांच्याकडून ९ दुचाकी जप्त करण्यात आल्यात. चोरट्यांकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
सदरची कारवाई गुन्हे शाखा युनिट क्रमांक २ पथकाचे पोलीस निरीक्षक राहुल आठवले यांच्या नेतृत्वाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक महेश इंगोले, पोलीस उपनिरीक्षक राजकिरण येवले, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र काळे, जावेद अहेमद, दीपक सुंदरकर, गजानन ढेवले, एजाज शहा, संग्राम भोजने, चेतन कराडे, राजीक रायलीवाले, योगेश पवार, जगन्नाथ लुटे यांनी केली
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.