विदर्भ

अमरावती : एसटीच्या धडकेत वृद्ध ठार; तिवसा बस स्थानकासमोरील घटना

backup backup
अमरावती, पुढारी वृत्तसेवा : तिवसा बस स्थानकावरून प्रवासी घेऊन निघालेल्या एसटी बसने राष्ट्रीय महामार्ग ओलांडत असताना ७५ वर्षीय वृद्धास चिरडले. पायावरून एसटीची चाके गेल्याने वयोवृध्द ठार झाल्याची घटना घडली आहे.
या अपघातात ठार झालेल्या वृद्धांचे नाव भानुदास अमृत खारकर (वय ७५ वर्ष रा.  वाठोडा ता. तिवसा) असे आहेे. तिवसा बस स्थानकावरून चालक संभा महादेव अंजनकर व वाहक राहुल सोहळे हे बस (क्र एम. एच. ४० वाय  ५२३७) चांदुर रेल्वे करिता सव्वा अकरा वाजताची फेरी घेवून जात होते. एसटी राष्ट्रीय  महामार्ग ओलांडत असतांना या वृद्धास धडक दिली. त्यामुळेे वृद्ध खाली कोसळले. त्यांच्या पायावरून एसटीचे मागचे चाके गेल्याने दोन्ही पाय चिरडले. त्यामुळे त्यांना तातडीने अमरावती रुग्णालयात दाखल केले. दरम्यान त्यांचा उपचारा दरमान मृत्यू झाला. एसटी अपघाताची माहिती होताच तिवसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. यावेळी एसटी महामंडळाचे विभागीय वाहतूक अधिकारी अभय बिहुरे, आगार व्यवस्थापक पवन देशमुख,  बस स्थानक प्रमुख प्रतीक मोहड यांनी त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना पी फॉर्म देऊन तातडीची 10 हजार रुपयांची मदत दिली.
SCROLL FOR NEXT