विदर्भ

सर्व यंत्रणांनी तत्पर रहाणे आवश्यक, निवडणूक ड्युटी, टाळाटाळ चालणार नाही : डॉ. विपीन इटनकर

backup backup

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : मतदान केंद्रातील आवश्यक सुविधा व सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व यंत्रणांनी तत्पर रहाणे आवश्यक आहे. निवडणूक कामातील टाळाटाळ कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही असा स्पष्ट इशारा जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिला.

आगामी लोकसभा निवडणूक पूर्वतयारी अनुषंघाने बचत भवन सभागृहात आयोजित माहिती तंत्रज्ञानाबाबत प्रशिक्षणात जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रविण महिरे, सावनेरचे उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, सूचना विज्ञान केंद्राचे अधिकारी हटवार, महाआयटीचे अधिकारी उमेश घुघुसकर तसेच संबधित वरिष्ठ पोलीस अधिकारी यावेळी उपस्थित होते.

मतदान केंद्राचा परिसर, यासाठी आवश्यक यंत्रणा, सुरक्षिततेच्या दृष्टीने नियोजन याचा त्यांनी निवडणूक विभागाशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. या प्रशिक्षणात उपविभागीय अधिकारी संपत खलाटे व सूचना विज्ञान केंद्राचे अधिकारी हटवार यांनी सी-व्हिजील व ई-एसएमएस बाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली. तसेच उपस्थितांनी विचारलेल्या शंकांचे निरसन केले. या प्रशिक्षणात माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समिती, भरारी पथक व सर्व्हेक्षण पथकाबाबत माहिती देण्यात आली.

SCROLL FOR NEXT