कामगाराचा नदीत फेकून खून File Photo
अकोला

दुर्दैवी अंत| बापानेच पोटच्या चिमुकल्यांना नदीत फेकून दिले

पुढारी वृत्तसेवा

अकोला: बापाने पोटच्या दोन चिमुकल्या मुलींना भिकुंड नदीत (ता.बाळापूर) फेकुन दिले होते. या दोन्ही मुलींचे मृतदेह पिंजर येथील बचाव पथकाने शनिवारी (दि.५) रात्री शोधून बाहेर काढले आहेत. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाच्या जवानांनी बेपत्ता असलेल्या दोन्ही बहिणींचे मृतदेह रात्रीच शोधुन बाहेर काढले.

शनिवार ५ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास बापाने आपल्या पोटच्या २ मुलींना नदीत फेकून दिल्याचे समोर आले. या घटनेच्या चौकशीनंतर अकोला जिल्ह्यातील बाळापुर येथील भिकुंडनदी पात्रात बापाने आपल्या वय-७ आणि ५ वर्षांच्या दोन मुलींना शुक्रावारी (दि.४) सायंकाळी फेकुन दील्याचे समजले. दरम्यान स्थानिकांकडून शोध मोहीम सुरू करण्यात आली होती. परंतु काहीच मिळुन आले नाही.

बुलढाणा जिल्हाधिकारी किरण पाटील आणि बाळापुर पोलीस ठाण्याचे पो.नि.अनिल जुंमळे  यांनी पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दिपक सदाफळे जिवरक्षक यांना माहीती देऊन तात्काळ सर्च ऑपरेशनसाठी पाचारण केले. बचाव पथक साहित्य घेऊन घटनास्थळावर पोहचले आणि शोध मोहिमेस प्रारंभ केला. शेवटी शनिवारी रात्री उशीरा १२ वाजता दोन्ही मृतदेह सापडले. घटनास्थळावर पोलीस अधीक्षक बुलढाणा विश्व पानसरे, डिवायएसपी ठाकरे, डिवायएसपी बाळापुर गजानन पडघन, पो.नि.अनील  जुमळे, पो.नि.ग्रामीण खामगाव व्यंकटेश आलेवार आणि नातेवाईक ही हजर होते.

पोलिसांकडून बापाची चौकशी सुरू 

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील कदमापूर येथील बापानेच बाळापुर ते अकोला राष्ट्रीय महामार्गावरील नदीमध्ये दोन चिमुकल्यां मुलींना फेकल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुलींच्या बापास ताब्यात घेत पुढील चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT