बिल मागितल्याने युवकाकडून पेट्रोल टाकून वाईनबार पेटवण्याचा प्रयत्न  File Photo
अकोला

बिल मागितल्याने युवकाकडून पेट्रोल टाकून वाईनबार पेटवण्याचा प्रयत्न

बारचे नुकसान, युवकाविरूद्ध गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

अकोला : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजर् येथील बायपासवरील वाईनबार मालकाने उधारिचे बिल मागितल्यावर युवकाने चक्क वाईन बारच्या काऊंटरला पेट्रोल टाकून पेटवून दिले. या घटनेत बार मालकाचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी पोलिस स्‍टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना (रविवार) सायंकाळी घडली.

या विषयी मिळालेल्‍या अधिक माहितीनुसार, पिंजर बायपासवर जयस्वाल वाईनबार आहे. या वाईनबारची उधारी रामा वानखडे नामक युवकाकडे होती. बार मालकाने त्‍याच्याकडे उधारी मागितली म्हणून युवकाचा राग अनावर झाला. त्‍या युवकाने पेट्रोल आणून काउंटरवर फेकले व काउंटर पेटवून दिले. या घटनेत दारूच्या काही बाटल्या आणि गल्ल्यातील रोख रक्कम जळून खाक् झाली आहे.

या प्रकरणी वाईन बारचे मालक अंकित जयस्वाल यांनी पिंजर पोलिसात रविवारी सायंकाळी तक्रार दाखल केली, त्यांच्या तक्रारीवरून रामा वानखडे विरुद्ध पिंजर् पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पिंजर पोलीस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT