अकोला

अमोल मिटकरी यांना धमकी, घरासमोर पोलिसांचा बंदोबस्त

backup backup
अकोला; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरींच्या  तोष्णीवाल  ले  आउट मधील  घरासमोर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. फोनवरुन मिळालेल्या धमकीच्या कॉल्सनंतर हा बंदोबस्त लागला आहे. यामध्ये जवळपास 7 ते 8 पोलिस कमर्चारी तैनात करण्यात आले.
आमदार अमोल मिटकरी यांना काल दिवसभरात धमकीचे  कॉल आले होते. घरावर आणि वाहनावर दगडफेक करण्याची धमकी फोनद्वारे देण्यात आली होती. या संदर्भात त्यांनी काल रात्री खदान पोलिसांत आपली तक्रार नोंदवली असून पुढील कारवाई सुरू आहे, त्यानंतर हा पोलिस बंदोस्तात लागला आहे.
SCROLL FOR NEXT