अकोला : अकोला जूने शहरातील गाडगे नगर ,सोनटक्के प्लॉट या भागात रविवारी (दि.8) उशिरा रात्री दोन गटात वाद झाला. त्यानंतर दगळफेक करण्यात आली. जुन्या वादातून ही घटना घडली असून या प्रकरणी पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतले अशी माहिती आहे . या घटनेनंतर परिसरात पोलिसांचा तगडा बन्दोबस्त लावण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, अकोला जूने शहर भागातील गाडगेनगर व सोनटक्के प्लॉट या परिसरात रविवारी उशिरा रात्री दोन गटात जोरदार वाद झाला. त्यानंतर दगडफेक करून काही वाहनांचे नुकसान करण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान जुन्या वादातून ही घटना घडल्याचे पोलिसांकडून सांगितले जात असून या प्रकरणी अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी सुरू आहे. परिसरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी केले आहे.