अकोला

Akola mayor news | अकोला मनपा महापौरपदी शारदा खेडकर तर उपमहापौर अमोल गोगे 

मनपामध्ये बहुमताची जुळवाजुळव करण्यात भाजपा यशस्वी ठरली आहे

पुढारी वृत्तसेवा

अकोला : महापालिकेच्या महापौर पदी भाजपच्या शारदा खेडकर यांची निवड झाली आहे. या सोबतच भाजपाचे अमोल गोगे यांची उपमहापौर पदावर निवड झाली. महापौर पदाच्या प्रमुख लढतीत शिवसेना ठाकरे गटाच्या सुरेखा काळे यांचा भाजपाच्या शारदा खेडकर यांनी पराभव केला होता.

अकोला मनपामध्ये भाजपा समावेशित शहरसुधार आघाडीची आयुक्तांकडे नोंद करत मनपामध्ये  बहुमताची जुळवाजुळव करण्यात भाजपा यशस्वी ठरली आहे.  शारदा रणजित खेडकर प्रभाग क्रमांक 15 च्या भाजपा नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. त्यांची महापौर पदावर आज निवड झाली .

या सोबतच प्रभाग क्र 18 मधील भाजपा नगरसेवक अमोल गोगे यांची उपमहापौर पदावर निवड झाली आहे. भाजपच्या शारदा खेडकर यांना 45 मत मिळाली. यामध्ये भाजपाचे 38 आणि मित्रपक्ष व अपक्ष यांचा सहभाग असल्याची एकंदरीत चर्चा होत आहे. महापौर पदाच्या या निवडीत एमआयएमचे 3 नगरसेवक तटस्थ राहिल्याची माहिती समोर येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT