Murtijapur Cooperative Society Elections
अकोला : मूर्तिजापूर तालुक्यातील ८ सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार असून, त्याविषयीचा कार्यक्रम जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे यांनी जाहीर केला आहे. जून महिन्यात मतदान घेण्याचे नियोजन आहे. त्यामुळे इच्छुकांच्या हालचाली वाढल्या आहेत.
घुंगशी, हातगाव, सिरसो, सोनोरी, सोनाळा परसोडा, सांगवी, राजुरा प्र. माना व कार्ली येथील सेवा सहकारी संस्थांची निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. मे महिन्यात नामनिर्देशन पत्र दाखल करणे, मागे घेणे आदी प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असून, जून महिन्यात मतदान घेण्याचे नियोजन आहे.
निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम संबंधित सहकारी संस्था, मूर्तिजापूर येथील सहायक निबंधक सहकारी संस्था कार्यालय, तसेच जिल्हा उपनिबंधक कार्यालयात नोटीसबोर्डवर प्रसिद्ध करण्यात आला आहे.