Akola Income Tax Raids in Jewellery Shop
अकोला : शहरातील गांधी रोड भागातील काही ज्वेलर्सवर आयकर विभागाच्या पथकाने आज (दि.१४) सकाळीच एकाच वेळी अचानक धाडी टाकल्या आहेत. यात पूनम ज्वेलर्स, अग्रवाल ज्वेलर्स, ईशा ज्वेलर्स, सगलवार ज्वेलर्स आणि एकता ज्वेलर्स यांचा समावेश आहे. या सराफा व्यावसायिकांची पथकाकडून चौकशी होत असल्याची प्राथमिक माहिती आहे. या धाडी संदर्भात अधिकृत माहिती अद्याप समजली नाही. मात्र, या धाडीमुळे व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाल्याचे समजते.
प्राप्त माहिती नुसार , आज सकाळी शहरातील काही नामांकित ज्वलेर्समध्ये आयकर विभागाच्या नागपूर आणि छत्रपती संभाजी नगर येथील पथकाने एकाच वेळी धाडी टाकल्या. प्रारंभी या धाडी कोणत्या विभागाकडून आहेत. या बाबत संभ्रम होता. मात्र, काही ज्वलेर्स मधील धाडी आयकर विभागाच्या पथकाने टाकल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या पथकातील अधिकारी धाडी टाकण्यात आलेल्या ज्वलेर्समध्ये कसून चौकशी करीत आहेत. या व्यासायिकाच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी, कागदपत्रांची तपासणी होत असेल, अशी चर्चा आहे . या छापेमारीनंतर ही कारवाई किती वेळ चालेल . यामधून काय माहिती समोर येईल. हे संबंधित विभागाने अधिकृत माहिती दिल्यावर समजू शकेल. अद्याप या पथकाकडून किंवा संबंधित अधिकाऱ्यांकडून या संदर्भात अधिकृत माहिती मिळालेली नाही.