File Photo
अकोला

अकोला : मंगळसूत्र चोरट्याचा पाठलाग करणाऱ्या पतीचा मृत्यू

अकोला रेल्वे स्टेशन परिसरात घडली होती घटना

पुढारी वृत्तसेवा

अकोला : अकोला रेल्वेस्थानक प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर पत्नीचे मंगळसूत्र हिसकावून पळत सुटणाऱ्या चोरट्याचा पती पाठलाग करताना चोरट्याने पतीच्या डोक्यावर व चेहऱ्यावर पेवर्स ब्लॉकच्या दगडाने मारहाण केली. या घटनेतील जखमी पतीचा अखेर 18 मार्च रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. हेमंत गावंडे असे या मृत पतीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी चोरट्यास अटक केली आहे.

प्राप्त माहिती नुसार, हिवरखेड येथून हेमंत गावंडे व त्यांच्या पत्नी अकोट-अकोला रेल्वेने रविवारी 16 मार्चला येत असताना अकोला रेल्वेस्थानकावरील फलाट क्रमांक चार वर आरोपीने विवाहितेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळ काढला . यावेळी हेमंत गावंडे या विवाहितेच्या पतीने त्याचा पाठलाग केला .चोरट्याने गावंडे यांच्या डोक्यावर व चेहऱ्यावर पेव्हर्सने गंभीर मारहाण केली. त्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान १८ मार्च रोजी त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात रवी नथ्थूलाल परमार (रा. कुंदाना, ता. कुंदाना सानवेर, जि. इंदूर) याला एमआयडीसी बीके चौकात पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी सोन्याचे मंगळ सूत्र ,चांदीचे ब्रासलेट व मोबाईल फोन जप्त करण्यात आला.

या प्रकरणी रामदासपेठ पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी रवी नथ्थूलाल परमार याला न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला २१ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT