अकोला, पुढारी वृत्तसेवा : तेल्हारा तालुक्यातील दहीगाव अवताडे येथील रहिवाशी दिनकर चतरसिंग सोळंके (वय ४५) हे ३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजेपूर्वी शेतात अडाण कापण्यासाठी गेले होते. ते शेताच्या बांधावर मृतावस्थेत आढळून आले.
या बाबत गजानन रमेश सोळंके (वय ३५, रा. दहीगाव) यांनी तेल्हारा पोलीस स्टेशनला माहिती दिली. यावरून पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी तेल्हारा शासकीय ग्रामीण रुग्णालयात पाठवून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.