अकोला - तेल्हारा तालुक्यातील पाथर्डी येथील शेतकरी नंदकिशोर कुकडे हे दुचाकीवरुन जात असताना अचानक हरीण दुचाकीवर येऊन धडकले. या घटनेत शेतकरी गंभीर जखमी झाले होत. पण उपचार सुरु असताना १६ जुलैला मृत्यू झाला.
या बाबत अधिक माहिती नुसार नंदकिशोर कुकडे हे पाथर्डी येथून भांबेरी येथे मेडिकल असल्याने ते दररोज जाणे-येणे करीत होते. अशातच १३ जुलै रोजी सकाळी पाथर्डी येथून भांबेरी गावाला जात असताना शेतातून धावत येणारे हरीण अचानक दुचाकीवर धडकले . या घटनेत कुकडे दुचाकीसह जोरात आदळल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती . नागरिकांनी त्वरित अकोला रुग्णालयात उपचारासाठी त्यांना पाठविले . दरम्यान उपचार सुरू असतानाच कुकडे यांचा मृत्यू झाला .