body found (File photo)
अकोला

Akola News | वृद्धाचा मृतदेह नदीकाठी आढळल्याने खळबळ

उरळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या धामना गावातील पूर्णा नदीकाठी एका वृद्धाचा मृतदेह रविवारी आढळून आला

पुढारी वृत्तसेवा

Purna river elderly man body found

अकोला : उरळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या धामना गावातील पूर्णा नदीकाठी एका वृद्धाचा मृतदेह रविवारी आढळून आला. याप्रकरणी उरळ पोलीस स्टेशनमध्ये मर्ग दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, धामना येथे मजूर म्हणून कामाला असलेल्या बाळू मारुती वाघमारे ( वय 65 ) यांचा रविवारी शेताच्या बाजूला पूर्णा नदीच्या काठावर मृतदेह आढळून आला. ते रायगड जिल्ह्यातून मजुरीच्या कामानिमित्ताने धामना येथे आले होते. त्याची पत्नी कमल बाळू वाघमारे यांची तक्रार पोलिसात नोंदविण्यात आली आहे.याबाबतचा पुढील तपास उरळ पोलीस करीत आहेत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT