'Education week' to be held in schools in Akola
अकोल्यात शाळांमध्ये शिक्षण सप्ताह Pudhari File photo
अकोला

अकोल्यात शाळांमध्ये होणार 'शिक्षण सप्ताह'

पुढारी वृत्तसेवा

अकोला, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 या धोरणाचा चौथा वर्धापन दिन पार पडत आहे. या पार्श्वभुमीवर दि.22 ते 28 जुलै या कालावधीत अकोला जिल्ह्यामध्ये सर्व व्यवस्थापन व माध्यमाच्या शाळामध्ये 'शिक्षण सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. शिक्षण सप्ताहात आठवड्याचा प्रत्येक दिवशी ए‌का विशिष्ट उपक्रमासाठी नियोजित करण्यात आला असून, ज्यात शिक्षण व विकासाच्या विविध पैलूंचा समावेश असणार आहे.

शिक्षण सप्ताहामधील उपक्रम

  • २२ जुलै - अध्ययन-अध्यापन साहित्य दिवस

  • २३ जुलै - मूलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिवस

  • २४ जुलै - क्रीडा दिवस

  • २५ जुलै - सांस्कृतिक दिवस

  • २६ जुलै - कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस

  • २७ जुलै- इको क्लब उपक्रम, शालेय पोषण दिवस

  • २८ जुलै - समुदाय सहभाग दिवस

हा शिक्षण सप्ताह विद्यार्थी, शिक्षक, धोरणकर्ते व भागधारक यांच्यामध्ये सहकार्य वाढविणारा ठरणार आहे. शाळांमध्ये शिक्षण सप्ताहाची यशस्वीरित्या अंमलबजावणी करण्यासाठी पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी यांना तालुका नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात येत आहे. शिक्षण सप्ताहामधील उपक्रमांची अंमलबजावणी नेमून दिलेल्या कालावधीत करावयाची आहे. शिक्षण सप्ताहादरम्यान आयोजित उपक्रमांची छायाचित्रे माहिती संकलनासाठी विकसित करण्यात येणार आहे

SCROLL FOR NEXT