प्रातिनिधिक छायाचित्र File Photo
अकोला

अकोला : अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल 

Akola Crime News | तेल्हारा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

अकोला, पुढारी वृत्तसेवा : तेल्हारा तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीस गावातीलच युवकाने फूस लावून पळवून नेल्याच्या संशयावरून तेल्हारा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Akola Crime News)

प्राप्त माहिती नुसार ,  अल्पवयीन मुलगी 12 मार्चरोजी सकाळी 9 वाजताच्या सुमारास , बारावीचे जुने पुस्तक अकोटला विकायला जाते. असे तिच्या आईला सांगून घरून निघून गेली. घरी परत न आल्याने तिचे आइने तिला मोबाइलवर कॉल केला. मात्र, तिने उचलला नाही. संशयित युवकही  घरी नसल्याचे समजले.  त्यामुळे  मुलीस फूस लावून पळवून नेल्याचा संशय तिच्या आईने व्यक्त करीत तेल्हारा पोलिसात तक्रार दिली.  या तक्रारीवरून पोलिसांनी  गुन्हा दाखल केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT