अकोला - अकोला तालुक्यातील दापुरा येथील कोलोरा नाल्यात दोन चिमुकल्यांचा बुडून मृत्यु झाल्याची घटना दि 7 मार्च रोजी दुपारच्या सुमारास घडली. या घटनेमुळे गावात शोक व्यक्त होत आहे.
प्राप्त माहितीनुसार, समर इंगळे व दिव्यांशू डोंगरे हे दोघे आणखी दोन मित्रांसोबत घराबाहेर गेले . गावाशेजारील कोलार नाल्यात उतरले. त्यांना पाण्यात पोहता न आल्याने समर योगेश इंगळे (वय १२) व दिव्यांशू राहूल डोंगरे (वय १४) यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला . या घटनेची माहिती सोबत असलेल्या दोन मुलांनी गावात जाऊन सांगितली. त्यानंतर नागरिक नाल्याजवळ पोहचले मात्र तोपर्यंत दोन्ही मुलांचा मृत्यू झाला होता.
बोरगाव मंजू पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आले.