Youth Dies of Electric Shock Pudhari
अकोला

Electrocution Death Akola | अकोला: तोल काट्यावर विद्युत तारांचा धक्का बसून तरुणाचा मृत्यू

Akola Telhara | तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड परिसरात दुर्दैवी घटना

पुढारी वृत्तसेवा

Youth Dies of Electric Shock Telhara

अकोला : अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड परिसरात एक दुर्दैवी घटना घडली आहे. विद्युत तारेला स्पर्श झाल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ज्ञानेश्वर कैलास गोमासे असे मृत तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर गोमासे हा तरुण आपले रोजचे कामकाज आटोपून तोल काट्यावर मोजणी करत होता. यावेळी अचानक त्याचा लोंबकळत असलेल्या विद्युत तारेशी स्पर्श झाला. या स्पर्शामुळे त्याला जबरदस्त विद्युत धक्का बसला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर तात्काळ त्याला उपचारासाठी तेल्हारा येथे नेण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

या घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, हिवरखेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात ठेवली आणि बंदोबस्त तैनात करण्यात आला. तसेच, संतप्त नागरिकांनी आणि नातेवाईकांनी मृताच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. विशेषतः महावितरण कंपनीकडून नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी जोर धरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT