Crime News Pudhari Photo
अकोला

Akola Fire Case | अडगाव येथील भीषण आग प्रकरणी घरमालकाला अटक

तेल्हारा तालुक्यातील अडगाव बु. येथे घराला लागलेल्या आगीत तिघांचा होरपळून मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

Akola Adgaon fire case

अकोला : तेल्हारा तालुक्यातील अडगाव बु. येथे घराला लागलेल्या आगीत तिघांचा होरपळून मृत्यू झाल्याच्या प्रकरणी पोलिसांनी घरमालकास अटक केली आहे. हिवरखेड पोलीस स्टेशन हद्दीतील या घटनेचा सखोल तपास केल्यानंतर शनिवारी (दि. १४) शेख इरफान शेख इब्राहिम याला अटक करण्यात आली. त्यास तेल्हारा न्यायालय यांनी १७ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

१२ फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे ८ वाजता अडगाव बु. येथे संबंधित घराला अचानक आग लागली होती. या आगीत रत्नाबाई चव्हाण, त्यांचा मुलगा आणि नात अशा तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सदर घर शेख इरफान शेख इब्राहिम यांचे असून त्याठिकाणी रत्नाबाई चव्हाण यांचे कुटुंब भाड्याने राहत होते. आगीत संपूर्ण घर जळून खाक झाले.

घटनेनंतर पोलिसांनी शेजारील चार पुरुष व एका महिलेचे जबाब नोंदवले. प्राथमिक तपासात डिझेलच्या साठ्यामुळे आग लागल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. त्यानुसार पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित करत घरमालकास अटक केली.

या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT