अकोला : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाकडून एक रकमी कर्ज परतावा योजना राबविण्यात येते. या योजनेच्या थकित कर्ज प्रकरणात एकरकमी कर्ज परतफेड केल्यास व्याज रकमेवर ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. ही एकरकमी परतावा (ओ.टी.एस) योजना दि. ३१ मार्चपर्यंत लागू राहील. ही योजना ठराविक कालावधीसाठी असून संबंधितांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.