अकोला : गळा दाबून पतीने केली पत्नीसह चिमुकल्या मुलीची हत्या File Photo
अकोला

अकोला : गळा दाबून पतीने केली पत्नीसह चिमुकल्या मुलीची हत्या

Akola crime: अकोल्यातील सिद्धार्थनगरातील घटना

पुढारी वृत्तसेवा

Akola man kills wife and daughter

अकोला :घरगुती वादातून रागाच्या भरात पतीने त्याची पत्नी आणि तीन वर्षाच्या सावत्र मुलीची गळा दाबून हत्या केल्याची घटना दि. 3 मे रोजी दुपारी अकोला शहरातील तारफैल परिसरातील सिद्धार्थ नगरमध्ये घडली . याप्रकरणी रामदास पेठ पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती.

प्राप्त माहितीनुसार , पती आणि पत्नी यांचा घरघुती कारणावरून नेहमी वाद होत होता. अशातच दि 3 मे रोजी सूरज गणवीर वय (३७) रा. सिद्धार्थ नगर, हा घरी जेवण करीत असताना त्याची दुसरी पत्नी अश्विनी वय ( 28) हिच्याशी वाद सुरू झाला. या वेळी सूरजने पत्नीचा दुप्पट्याने तिचा गळा दाबून मारले . त्यानंतर सावत्र मुलगी आरोही या तीन वर्षीय चिमुकलीला देखील असेच मारले.

अश्विनी ही सूरज याची दूसरी पत्नी होती. मागील काही दिक्सांपासून या दोघांमध्ये सतत घरगुती वाद होऊन भांडण होत होते अशी माहिती आहे . अश्विनीवर एक लाखाचे कर्ज होते से सूरजने फेडले. अश्विनीसोबत लग्न झाल्यानंतर, कधी कधी सूरजची पहिल्या पत्नीपासूनची मुले त्यांच्या घरी येत होती .त्यामुळे अश्विनी आणि सूरज यांच्यात वाद होत होता अशी माहिती आहे.

स्वत: पोलिसांना हत्येची दिली माहिती

पत्नी व मुलीची हत्या केल्यानंतर सूरजने पोलिसांना खून केल्याची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी गेल्यावर सूरज घरी बसून होता . पोलिसांनी यावेळी पंचनामा करून आरोपी सूरजला अटक केली . दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आले. सूरज विरुध्द रामदासपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे .

घटनेची माहिती मिळताच शहर उपविभागीय पोलिस अधिकारी सतीश कुलकर्णी, तसेच रामदासपेठ पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक अरुण परदेशी घटनास्थळी दाखल झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT