अकोला : तेल्हारा तालुक्यातील निंभोरा शेतशिवारातील वाघमारे डीपी मध्ये असलेल्या इलेक्ट्रिक पोलवरील अॅल्युमिनियमची एकूण २१ गाले तार किंमत अंदाजे १ लाख ५० हजार रुपये अज्ञात इसमाने चोरून नेल्याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे .
प्राप्त माहितीनुसार, रितेश पुरुषोत्तम वाघोडे वरिष्ठ तंत्रज्ञ, महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी उपविभाग तेल्हारा, शाखा भांबेरी यांनी पोलिसात तक्रार दिली. बुधवार ६ मे रोजी निंभोरा (ता. तेल्हारा )येथील अंबादास देवराव रोठे (रा. निंभोरा) यांनी फोनद्वारे माहिती दिली की, निंभोरा शेत शिवारातील वाघमारे डीपीमध्ये असलेल्या इलेक्ट्रिक पोलवरील अॅल्युमिनियमची एकूण २१ गाले तार अज्ञात इसमाने चोरून नेली.
या माहितीवरून गुरुवारी ७ मे रोजी दुपारी पोलिसात तक्रार नोंदविली आहे. दरम्यान तेल्हारा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ चे कलम ३०२ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.