Pudhari File Photo
अकोला

अकोला : फळपीक विमा योजनेसाठी ई-पीक पाहणी बंधनकारक

पुढारी वृत्तसेवा

अकोला : पुनर्रचित हवामानाधारित फळपीक विमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी करणे बंधनकारक आहे. फळपिकांचा विमा घेतला आहे पण अद्यापही मोबाईल ॲपद्वारे ई-पीक पाहणी डिजीटल क्रॉप सर्वे पूर्ण न केलेल्या सर्व संबंधित शेतकऱ्यांनी दि. २५ एप्रिलपूर्वी ई- पिक पाहणी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी केले.

सातबारा उताऱ्यावर ई-पीक पाहणीची नोंद नसलेले सर्व विमा अर्ज रद्द करण्यात येणार आहेत आणि- त्यांना फळपीक विम्याचा लाभ मिळणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. पुनर्रचित हवामानाधारित फळ पीक विमा योजना राज्यात भारतीय कृषी विमा कंपनी, बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स कंपनी, फ्युचर जनरली इन्शुरन्स कंपनी व युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी आदी विमा कंपन्यांमार्फत राबविण्यात येत आहे. मृग बहार २०२४ मध्ये संत्रा, मोसंबी, डाळिंब, द्राक्ष, चिकू, पेरू, सिताफळ व लिंबू या आठ फळपिकांसाठी २६ जिल्ह्यांमध्ये, तर आंबिया बहार सन २०२४-२५ मध्ये डाळिंब, संत्रा, मोसंबी, काजू, केळी, द्राक्ष, आंबा, पपई व स्टॉबेरी या ९ फळपिकांसाठी ३० जिल्ह्यांमध्ये फळपिकांना हवामान धोक्यांच्या निकषानुसार योजना राबविण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT