by-elections File Photo
अकोला

Akola Sarpanch Election | अकोला जिल्ह्यात १३ सरपंच व १२६ सदस्य पदांसाठी पोटनिवडणूक जाहीर; २८ एप्रिलरोजी मतदान

Akola Local Body Elections | मतमोजणी २९ एप्रिलरोजी

पुढारी वृत्तसेवा

Akola Gram Panchayat Bye Election

अकोला  : राजीनामा, निधन, अनर्हता आदी कारणांमुळे रिक्त झालेल्या ग्रा. पं. सदस्य, थेट सरपंच पदांच्या निवडणुकांसाठी कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने घोषित केला आहे.
त्यात अकोला जिल्ह्यातील ७६ ग्रामपंचायतीतील १३ थेट सरपंच पदे व १२६ रिक्त सदस्य पदांसाठी पोटनिवडणूक होणार आहे.

या अनुषंगाने आयोगाच्या सूचनांचे काटेकोर पालन व्हावे व निवडणूक क्षेत्रात आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी सर्व यंत्रणांना दिले आहेत.

कार्यक्रमानुसार, तहसीलदारांनी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करण्याची तारीख ३० मार्च आहे. नामनिर्देशनपत्रे दि. ७ ते १३ एप्रिल या काळात (शनिवार व रविवार वगळून) स. ११ ते दु. ३ या वेळेत सादर करता येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी दि. १५ एप्रिल रोजी सकाळी ११ वा. पासून होईल. दि. १७ एप्रिल रोजी दु. ३ वा. पर्यंत  नामनिर्देशन पत्र मागे घेता येईल.

निवडणूक चिन्ह नेमून देणे, तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणा-या उमेदवारांची यादी दि. १७ एप्रिलला दु. ३ नंतर प्रसिद्ध करण्यात येईल. आवश्यक असल्यास मतदान दि. २८ एप्रिल रोजी सकाळी ७.३० ते सायं. ५.३० या वेळेत होईल. मतमोजणी व निकाल दि. २९ एप्रिल रोजी जाहीर करण्यात येईल. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना दि. ६ मे रोजी प्रसिद्ध होईल. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT