धरती आबा अभियान Pudhari News Network
अकोला

Central Government Tribal Scheme | 'आदिवासी विकासासाठी केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी मोहीम'; ‘धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’

अंतर्गत जिल्हाभरात विशेष शिबिरे

पुढारी वृत्तसेवा

Tribal Development Mission

अकोला: भारत सरकारने जनजातीय गौरव वर्ष २०२५ निमित्त आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी दोन महत्त्वपूर्ण आणि कालबद्ध उपक्रम हाती घेतले आहेत. 'प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महा अभियान' आणि 'धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान' या योजनांच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना सक्षम बनवण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत.

या उपक्रमांतर्गत 'धरती आबा अभियान' (जागरूकता व सेवा पोहोचविण्याची मोहीम) आणि 'धरती आबा कर्मयोगी' (कौशल्य व क्षमता विकास कार्यक्रम) या माध्यमातून अनेक क्षेत्रातील शासकीय सेवा थेट गावांमध्ये उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

मतदाता ओळखपत्र, आधार ओळखपत्र, शिधापत्रिका, आयुष्मान भारत आरोग्य पत्रिका, जात प्रमाणपत्र, पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना, जन धन खाते इत्यादी अत्यावश्यक सेवा आणि लाभ एकाच ठिकाणी मिळावेत यासाठी १५ जून ते ३० जून २०२५ या कालावधीत गाव व गटस्तरावर विशेष शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत.

या शिबिरांचे आयोजन स्थानिक प्रशासन, विविध शासकीय विभाग, सेवा देणारे कर्मचारी, स्वयंसेवी संस्था आणि संगणकीय सेवा केंद्र यांच्या सहकार्याने करण्यात येत आहे. यामुळे अनेक अडथळ्यांमुळे लाभ मिळवू न शकलेल्या आदिवासी कुटुंबांपर्यंत महत्त्वाच्या सेवा आणि योजना पोहोचवण्यास मदत होणार आहे.

या अभियानांतर्गत जिल्हा प्रशासनाने तालुका व गटस्तरीय तपशीलवार योजना व शिबिरांचे वेळापत्रक तयार केले आहे. याशिवाय सिकल सेल दिन आणि आंतरराष्ट्रीय योग दिन यांसारख्या खास दिवशीही जनजागृती उपक्रम राबवले जाणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT