Akot Akolkhed Woman Death AI
अकोला

Akola Woman Drown | मेंढरांच पिल्लू वाचविण्याचा प्रयत्नात महिलेचा विहिरीत पडून मृत्यू

अकोट तालुक्यातील अकोलखेड येथील शेतशिवारात

पुढारी वृत्तसेवा

Akot Akolkhed Woman Death

अकोला :  अकोट तालुक्यातील अकोलखेड येथील शेतशिवारात मेंढरांचे पिल्लू वाचविण्याच्या प्रयत्नात एका महिलेचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना २ जून रोजी घडली.

प्राप्त माहिती नुसार,कारला येथील मेंढीपालन करणारे कुटुंब अकोलखेड शेतशिवारात मेंढ्या चारण्यासाठी आले आहेत. दरम्यान मंगळवारी २२ वर्षीय उषा दिपक पारखे हिला मेंढराचे लहान पिल्लु विहीर जवळ गेल्याचे दिसले.ते विहीर पडुन नये या प्रयत्नात पिल्लू हाकलत असताना तोल जावून ही महिला विहीरीत पडली. या घटनेत तीचा दुदैवी मृत्यू झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT