अकोट शहर व अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त कारवाईमुळे २७ गोवंशाना जीवदान मिळाले.  File Photo
अकोला

अकोटमध्ये २७ गोवंशांना मिळाले जीवनदान

पुढारी वृत्तसेवा

अकोला, पुढारी वृत्तसेवा : अकोट शहर व अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त कारवाईमुळे २७ गोवंशाना जीवदान मिळाले. या प्रकरणी पोलिसांनी अंदाजे 20 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आह़े. ही कारवाई २ ऑक्टोबर रोजी करण्यात आली.

पोपटखेड गेटवरून एक आयशर वेगाने व बेकायदेशीरपणे येत आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून सहायक पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल यांनी पोलीस स्टेशन अकोट ग्रामीण व अकोट शहर पोलीस स्टेशनमधून दोन टीम तयार करून पाठविले. पोलिसांना हिवरखेड रोडने एक आयशर भरधाव येताना दिसला. त्यास थांबविण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांच्या अंगावरून आयशरने कट मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांनी हे वाहन अडगाव येथे थांबविले. यामध्ये २७ गोवंश आढळले. विशेष म्हणजे पोपटखेड जवळ वन विभागामध्ये जाण्याकरता तपासणी नाका आह़े. तपासणी नाक्याच्या गेटलाही आयशर ट्रक चालकाने वेगाने वाहन चालवून जबर धडक दिली. या प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेतले आह़े. आरोपी हे उत्तरप्रदेश मधील सरहानपुर जिल्ह्याचे असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT