Accident  Pudhari
अकोला

Akola Accident : अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार; मलकापूर फाट्यावरील भीषण अपघात, मृताची ओळख पटवण्याचे पोलिसांसमोर आवाहन

पुढारी वृत्तसेवा

अकोला : मूर्तिजापूर तालुक्यातील माना पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एका इसमाचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. हा अपघात २१ एप्रिल रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास मलकापूर फाट्याच्या पश्चिमेस २०० मीटर अंतरावर घडला.

अपघाताची भीषणता

मिळालेल्या माहितीनुसार, अपघात इतका भीषण होता की धडक बसल्यानंतर मृतकाचे शरीर छिन्न-विछिन्न झाले आहे. अंधाराचा फायदा घेऊन अपघातग्रस्त वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाला असून, अद्याप मृतकाची ओळख पटू शकलेली नाही.

पोलीस कारवाई आणि तपास

या घटनेची माहिती मिळताच माना पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या प्रकरणी माना पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम २८१ आणि १०६(१) अन्वये अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी परिसरातील गावांमध्ये चौकशी केली, मात्र अद्याप कोणतीही माहिती हाती लागलेली नाही.

नागरिकांना आवाहन करण्यात येते की, जर कोणाला या मृतकाबाबत काहीही माहिती मिळाल्यास त्यांनी तातडीने माना पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, जेणेकरून मृतकाची ओळख पटवून पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करता येईल.
— गणेश नावकार, ठाणेदार, माना पोलीस स्टेशन

मदत करण्याचे आवाहन

पोलिस प्रशासन सध्या सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक बाबींच्या आधारे तपास करत आहे. कोणाचा नातेवाईक किंवा ओळखीची व्यक्ती बेपत्ता असल्यास संबंधित पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT