अकोला - बार्शीटाकळी तालुक्यातील हातोला गावात विजेचे काम करीत असतांना वीज खांबावरून खाली पडल्याने वीज कंपनी महान मधील बाह्यस्त्रोत तंत्रज्ञ कर्मचारी दीपक सेवकराम ठाकरे वय 34 यांचा मृत्यू झाल्याची घटना 19 मे रोजी घडली .
प्राप्त माहिती नुसार ,दीपक सेवकराम ठाकरे हे हातोला गावात विजेचे काम करत असताना विद्युत पोलवरून खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती . बार्शीटाकळी तालुक्यातील महान जवळील हातोला गावात सकाळी 11:30 वाजताच्या सुमारास काम करत असतांना ही घटना घडली . त्यांच्यावर संध्याकाळी खोपडी गावात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.