विदर्भ

अकोला: सलग दुस-या दिवशी हत्या; कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह!

अमृता चौगुले

अकोला, पुढारी वृत्तसेवा : अकोला येथे जुने शहरातील भांडपुरा चौकात एका 30 वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला. जुने शहर पोलीस ठाण्यांतर्गत ही घटना घडली असून अमिन खान (वय 30) याचा जुन्या वादातून हत्या करण्यात आली आहे. शहरात सलग दुस-या दिवशी घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, अमीन खान याचा भंगारचा व्यवसाय आहे. या तरुणाच्या मानेवर तलवारीने वार करण्यात आले. हल्ला करून हल्लेखोर पळून गेले. रक्ताने माखलेल्या तरुणाला परिसरातील लोकांनी सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अमीन खान यांचे याच भागातील एका गटाशी भांडण होऊन हाणामारी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

दोन दिवसांत दोन खुनाच्या घटना

गेल्या दोन दिवसांत शहरात सलग दोन खुनाच्या घटना घडल्या आहेत. रविवारी जठारपेठ परिसरात शिवसेनेचे अकोला पूर्व विभागाचे उपशहरप्रमुख विशाल कापले यांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. यानंतर जुने शहर परिसरातील दुसरी घटना घडली आहे. विलास कापले खून प्रकरणातील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

बारमालकावर हल्ला 

गेल्या काही काळात अशा गुंडगिरीच्या आणि दादागिरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. या समाजकंटकांवर पोलिसांनी कडक कारवाई करणे अत्यंत गरजेचे आहे. पोलिस विभागाने शहरातील संवेदनशील ठिकाणी कडक आणि धडाकेबाज अधिका-यांची नियुक्ती करावी अशी अपेक्षा नागरिकांनी मागणी केली आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT