President Draupadi Murmu l 
विदर्भ

नागपूर: विदर्भ दौऱ्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मुंबईकडे रवाना

मोनिका क्षीरसागर

नागपूर; पुढारी वृत्तसेवा: राष्ट्रपतीपदाची धुरा स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या महाराष्ट्र दौऱ्यावर आल्या आहे. दरम्यान विदर्भ दौऱ्यातील नागपूर, गडचिरोली येथील विविध कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर राष्ट्रपती मुर्मू गुरुवारी(दि.६जून) मुंबईकडे रवाना झाल्या आहेत.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे मंगळवारी, ४ जुलैला सायंकाळी नागपुरात आगमन झाले होते. ५ जुलै रोजी सकाळी गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठाचा दीक्षांत समारंभात त्यांनी सहभाग घेतला. त्यानंतर सायंकाळी कोराडीतील सांस्कृतिक केंद्राचे लोकार्पण राष्ट्रपतींच्या हस्ते झाले. गुरुवारी सकाळी त्यांनी राजभवन येथे आदिवासी समुदायातील मान्यवरांशी संवाद साधला.

आज सकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावरून मुंबईला रवाना झाल्या आहेत. यावेळी विमानतळावर राज्यपाल रमेश बैस ,पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एअर मार्शल विभास पांडे, मेजर जनरल एस. के. विद्यार्थी, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी,पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मुक्ता कोकड्डे, जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर, पोलीस अधीक्षक विशाल आनंद आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT