विदर्भ

अमरावती : क्रिकेट सट्टा प्रकरणी एकास अटक, राजापेठ पोलिसांची कारवाई

रणजित गायकवाड

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : बडनेरा रोडवरील तापडिया मॉलमधून मोबाईलवरून क्रिकेट सट्टा खेळणार्या एका आरोपीला राजापेठ पोलिसांनी रविवारी पकडले. रितेश राजकुमार रामरख्यानी (३४, रा. कृष्णा नगर गली क्र. १) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून मोबाईल व रोख रकमेसह १ लाख ३५ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

तापडिया मॉलच्या एका कोपर्यात बसून एक व्यक्ती मोबाईल अॅपच्या माध्यमातून क्रिकेटवर सट्टा लावत असल्याची माहिती राजापेठ पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून राजापेठ पोलिसांनी तापडिया मॉलमध्ये जाऊन आरोपी रितेश राजकुमार रामरख्यानी याला अटक केली. त्याच्याकडून ५ हजार २०० रुपये रोख

आणि सॅमसंग फोल्ड ग्रँड नोट ३ मोबाईल असा १ लाख ३५ हजार २०० रुपयांचा माल जप्त केला आहे. आरोपीविरुद्ध राजापेठ ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सट्टेबाजीशी रितेश कोणत्या बुकींच्या संपर्कात होता, कोणकोणत्या सट्टेबाजीशी संबंधित आहेत, याचा तपास पोलीस करत आहेत. सीपी नवीनचंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली डीसीपी विक्रम साळी, एसीपी पूनम पाटील, राजापेठचे पीआय मनीष ठाकरे, पीएसआय गजानन काठेवाडे, पोलिस हवालदार मनीष करपे, पंकज खाटे, रवी लिखीतकर, दानिश शेख, सागर भजगवरे यांनी कारवाई केली.

SCROLL FOR NEXT