गोंदिया : जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील भसबोळण येथील आदिवासी युवतीची हवाई सुंदरी म्हणून निवड झाली आहे. तिचे गाव जेमतेम 20-22 घरांचे असून, सर्व घरे थाटरा मातीने लिपलेले आहेत. आदिवासी समाजातील तरुणी हवाई सुंदरी झाल्याने गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी समाजासाठी गौरवाची बाब ठरली.
सुषमाचे प्राथमिक शिक्षण पहिली ते चौथीपर्यंत भसबोळण येथील जि. प. शाळेत, माध्यमिक शिक्षण 4 कि. मी. अंतरावरील झाशीनगर येथील आदिवासी विकास विद्यालयात झाले. बारावीत सुषमाने गुणवंत होऊन पुढील शिक्षण नागपूर येथे घेतले. मुंब ई येथे एअर होस्टेस प्रशिक्षणासाठी जाऊन प्रशिक्षणात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली. दरम्यान, एअर इंडिया व इंडिगो कंपनीने हवाई सुंदरी म्हणून ऑर्डर दिली असता सुषमा एअर इंडियात हवाई सुंदरी म्हणून रुजू झाली.