विदर्भ

चंद्रपूर : विषारी सापाच्या दंशाने विद्यार्थिनीचा मृत्यू

अनुराधा कोरवी

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : रात्री घरी झोपी गेलेल्या अकरा वर्षीय मुलीला विषारी सापाच्या दंशाने मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना नागभिड तालुक्यातील चिंधिमाल या गावी आज गुरुवारी (दि. २०) रोजी पहाटेच्या  सुमारास घडली. अप्सरा विलास सुतार असे त्या मुलीचे नाव असून ती पाचवीच्या वर्गात शिकत होती.

चिंधीचक गट ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या चिंधीमाल गावी काल बुधवारी संपूर्ण सुतार कुटुंबीय रात्रीचे जेवण केल्यानंतर झोपी गेले होते. दरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास झोपेत असलेल्या अप्सरा सुतारला विषारी सापाने दंश केला. सदर घटनेची जाणीव होतात कुटुंबीय जागे झाले. त्यांनी साप चावल्याची खात्री झाल्याने लगेच तिला नागभिड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले.

अकरा वर्षीय अप्सरा नागभिड येथील कर्मवीर शाळेत इयत्ता ५ वीच्या वर्गात शिकत होती. तिच्या दुर्दैवी मृत्यूने सुतार कुटुंबीयासह गावावर शोककळा पसरली आहे. अप्सरा ही विलास सुतार यांची ही सर्वात लहान मुलगी होती. तिच्या पश्यात आई, वडील एक भाऊ व दोन बहिणी आहेत.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT