विदर्भ

गडचिरोली : पुरामुळे १८ मार्ग अजूनही बंदच

रणजित गायकवाड

गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात कालपासून (दि. 16) पाऊस थांबला असला; तरी गोसेखुर्द धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग करण्यात येत आहे. परिणामी नदी, नाल्यांना पूर आला आहे. त्यातच तब्बल 18 मार्गांवरील वाहतूक तीन दिवसांपासून बंदच आहे. भामरागड, देसाईगंज, गडचिरोली आणि सिरोंचा तालुक्यातील 43 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणातून 6 लाख 32 हजार 268 क्यूसेक्स, तर तेलंगणातील मेडिगड्डा धरणाच्या 85 दरवाजांमधून 10 लाख 25 हजार 602 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग केला जात आहे. यामुळे वैनगंगा, गोदावरी, प्राणहिता आणि इंद्रावती नद्यांची पाणी पातळी धोका पातळीच्या वर पोहचली आहे.

पुरामुळे गडचिरोली-आरमोरी,गडचिरोली-चामोर्शी, आलापल्ली-भामरागड, देसाईगंज-लाखांदूर, आष्टी-गोंडपिपरी, सिरोंचा-कालेश्वरम या प्रमुख मार्गांसह कोरची-भिमपूर-बोटेकसा, कोरची-मसेली-बेतकाठी, लाहेरी-बिनामुंडा, अहेरी-लंकाचेन, अहेरी-वट्रा, अहेरी-देवलमरी इत्यादी मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे.

SCROLL FOR NEXT