Uddhav Thackeray
Uddhav Thackeray 
महाराष्ट्र

राहुल गांधी काय चुकीचे बोलले? उद्धव ठाकरेंचा सवाल

पुढारी वृत्तसेवा

लाेकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी सभागृहात केलेल्‍या हिंदुत्त्‍वावरील विधानावरुन सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. या विधानावरुन भाजप नेत्‍यांनी राहुल गांधी यांच्‍यावर टीकेची झोड उठवली आहे. तर इंडिया आघाडीतील मित्र पक्षांचे नेते त्‍यांचे समर्थन करत आहेत. आज (दि.२जुलै) शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींनी हिंदुत्त्‍वाबाबत केलेल्‍या विधानाचे समर्थन केले.

खरच त्‍यांनी हिंदुत्वाचा अपमान केला होता का?

आज माध्‍यमांशी बोलताना उद्धव ठाकरे म्‍हणाले की, "राहुल गांधी हे चुकीचे काय बोलले? त्‍यांनी कुठे हिंदू धर्माचा अपमान केला? लोकसभेत त्‍यांना भगवान शिवाचे चित्र दाखवू दिले नाही. खरच त्‍यांनी हिंदुत्वाचा अपमान केला होता का? ते भाषण मी स्वतः पाहिले आहे. आम्हीही हिंदू आहोत आणि आमच्यापैकी कोणीही हिंदुत्वाचा अपमान सहन करणार नाही. आमचे हिंदुत्व आहे पवित्र."

लोकसभा अध्यक्षांनी राहुल गांधी यांच्या भाषणातील काही शब्द आणि ओळी काढल्या

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बोललेल्या काही गोष्टी सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकण्यात आल्या आहेत. यावरूनच राजकारण तापले आहे. काढून टाकलेला भाग पुन्हा सभागृहाच्या कामकाजात समाविष्ट करण्याची विनंती राहुल गांधी यांनी लोकसभा अध्यक्षांना केली आहे.

लोकसभा अध्यक्षांच्या सूचनेनुसार काढण्यात आलेल्या भागात देशातील दोन प्रमुख उद्योगपतींच्या नावांचाही समावेश आहे. याशिवाय, चर्चेदरम्यान राहुल गांधी यांनी घाबरू नका आणि घाबरवू नका असा उल्लेख केला होता आणि ते म्हणाले की, भगवान शिवजी अभय मुद्रा दाखवतात आणि घाबरू नका, घाबरवू नका म्हणतात, अहिंसेबद्दल बोलतात. यानंतर राहुल गांधींनी बोललेल्या चार ते पाच ओळी संसदेच्या कामकाजातून काढून टाकण्यात आल्या आहेत. पंतप्रधानांच्या हस्तक्षेपानंतर राहुल गांधींच्या विधानाची एक ओळ सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकण्यात आली आहे.

तुम्ही शिवजींचे दर्शन घ्या, असा उल्लेख राहुल गांधी यांनी आपल्या वक्तव्यात केला होता. त्यांच्या प्रतिमेवरून तुम्हाला कळते की हिंदू भय पसरवू शकत नाहीत, हिंदू हिंसाचार पसरवू शकत नाहीत, हिंदू द्वेष पसरवू शकत नाहीत. यानंतर राहुल गांधी यांनी भाजपबद्दल काही गोष्टी बोलल्या होत्या, त्या सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकण्यात आल्या आहेत. एवढेच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हसण्यावरून राहुल गांधी बोलले होते, त्या गोष्टीही सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकण्यात आल्या आहेत. राहुल गांधींनी अग्निवीरवर बोललेल्या काही गोष्टीही सभागृहाच्या कामकाजातून काढण्यात आल्या आहेत.

SCROLL FOR NEXT