Rohit Pawar Pudhari
महाराष्ट्र

Rohit Pawar: ...तेव्हा मी विचाराच्या बाजूने लढलो, उद्याही तीच भूमिका कायम; रोहित पवारांची सूचक पोस्ट

Ajit Pawar Case Investigation: अजितदादांसाठी आणि जनतेसाठी आपला लढा सुरूच राहील, असा ठाम निर्धार रोहित पवार यांनी सोशल मीडिया पोस्टमधून व्यक्त केला.

Rahul Shelke

Rohit Pawar Questions Delay in Ajit Pawar Case Investigation: आदरणीय अजितदादांना जाऊन आज १० महिने पूर्ण झाले आहेत. मात्र, त्यांच्या अपघाताच्या किंवा घातपाताच्या संशयास्पद प्रकरणात अद्याप एफआयआर दाखल झालेला नाही. तसेच या प्रकरणाचा कोणताही ठोस तपास झालेला नाही, अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी या प्रकरणावरून संताप व्यक्त केला आहे.

रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, अजितदादांसारखा मोठा माणूस आपल्यातून निघून गेला. मात्र, त्यांच्या अपघाताच्या किंवा घातपाताच्या प्रकरणाच्या तपासाबाबत कोणालाही गांभीर्य नसल्याचे दिसत आहे. या घटनेला दहा महिने उलटूनही अद्याप एफआयआर दाखल झालेला नाही किंवा तपासालाही सुरुवात झालेली नाही, ही बाब अत्यंत खेदजनक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पुढे रोहित पवार यांनी राजकीय परिस्थितीवरही भाष्य केले. अनेकांनी सत्यापेक्षा सत्तेला अधिक महत्त्व दिल्याचे आपण पाहिले आहे आणि आजही पाहत आहोत, असे त्यांनी म्हटले. मात्र, काहीही झाले तरी अजितदादांसाठी आणि सर्वसामान्य जनतेसाठी सुरू केलेला लढा थांबणार नाही, असा ठाम निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

२०२२ मध्ये अजितदादांनी वेगळा राजकीय निर्णय घेतला होता. त्या वेळी नातेसंबंध बाजूला ठेवून आपण विचारधारेच्या बाजूने लढण्याची भूमिका घेतली होती, याची आठवणही रोहित पवार यांनी करून दिली. आजही आणि भविष्यातही आपली हीच भूमिका कायम राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

रोहित पवार यांच्या या पोस्टमुळे अजितदादांच्या प्रकरणाच्या तपासाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दहा महिने उलटूनही तपासाबाबत ठोस माहिती समोर आलेली नाही असा आरोप करत त्यांनी या प्रकरणात सत्य समोर येईपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT