Intensity of rain will increase in maharashtra
राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार Pudhari Newsnetwork
महाराष्ट्र

राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार

मोनिका क्षीरसागर

पुढारी न्यूज नेटवर्क: गेल्या एक आठवड्यांहून पावसाने उघडीप घेतली होती. मात्र बुधवार १९ मे पासून राज्यातील अनेक जिल्ह्यात रिमझिम पावसाला सुरूवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर पुढील काही तासांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता (Weather Forecast) पुणे हवामान विभागाचे विभागप्रमुख डॉ.के.एस.होसाळीकर यांनी दिली आहे.

सिंधुदुर्गमध्ये उद्या अतिवृष्टीची शक्यता

डॉ. के.एस. होसाळीकर यांनी केलेल्या ‘X’ पोस्टमध्ये म्हटले आहे की, पुढील २४ ते ४८ तासांत राज्याच्या अंतर्गत भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. यामध्ये कोकणत विभागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच सिंधुदुर्गमध्ये उद्या २३ जून रोजी रेड अलर्ट असून, अतिवृष्टीची शक्यता आहे, असे देखील हवामान विभागाने वर्तवली आहे.

दक्षिण कोकणासह राज्यात हळूहळू जोर वाढणार

आजपासून पुढील ४,५ दिवस दक्षिण कोकणासह राज्यात पावसाचा जोर हळूहळू वाढण्याची शक्यता आहे. राज्यातील काही जिल्ह्यात IMD द्वारे अतिवृष्टीचे अलर्ट जारी केले आहेत. मराठवाड्याच्या काही भागात आज (दि.२२ जून) वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे, असेही पुणे हवामान प्रादेशिक विभागाचे विभागप्रमुख डॉ.के. एस. होसाळीकर यांनी स्पष्ट केले आहे.

राज्यातील 'या' भागांना ऑरेंज अलर्ट

  • २२ जून: सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि उर्वरित महराष्ट्रात यलो अलर्ट

  • २३ जून: सिंधुदुर्ग (रेड अलर्ट), रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा

  • २४ जून: सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर आणि सातारा

  • २५ जून: सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, ठाणे, पुणे आणि सातारा

  • २६ जून: सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, सातारा आणि पुणे

SCROLL FOR NEXT