ठाणे

हॅलो डॉक्टर..मी एकनाथ शिंदे बोलतोय…

सोनाली जाधव

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा, हॅलो डॉक्टर.. मी एकनाथ शिंदे बोलतोय…आमचा कार्यकर्ता आपल्या रुग्णालयात उपचार घेत आहे. त्यांची काळजी घ्या, काही लागलं तर सांगा…माझा कार्यकर्ता जगला पाहिजे… हे संभाषण एकनाथ शिंदे यांचे डोंबिवलीतील एका खासगी रुग्णालयातील डॉक्टरांशी फोनवर झाले. डोंबिवलीतील शिवसेना उपशहरप्रमुख राम मिराशी यांची प्रकृती 21 तारखेला अचानक बिघडल्याने त्यांना या रुग्णालयात दाखल करण्यात आले. अतिदक्षता विभागात मिराशी यांच्यावर उपचार सुरू आहेत. आपल्या शिवसैनिकाची तब्बेत बिघडल्याची माहिती मंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाली. गुरूवारी सायंकाळी साडेपाच वाजता शिंदेंनी डॉक्टरांना
कॉल केला. आमचा कार्यकर्ता आपल्या रुग्णालयात उपचार घेत आहे, त्याची काळजी घ्या, असे सांगून प्रकृतीविषयी विचारपूस केली. महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय भूकंप झाला असून सरकार पडेल का, अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे. राजकीय कामात गुंतलेले असतानाही एकनाथ शिंदे यांनी आपल्या कार्यकर्त्याची फोनवरून चौकशी केल्याबद्दल शिवसैनिकांनी समाधान व्यक्त केले

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT