ठाणे

सफाई कर्मचार्‍यांना साहित्य मिळेना

अमृता चौगुले

कल्याण : पुढारी वृत्तसेवा :  पावसाळ्यात संसर्गजन्य रोगास प्रतिबंध करण्यासाठी स्वच्छता महत्त्वाची आहे. पावसामुळे स्वच्छतेत बाधा येऊ नये म्हणून घनकचरा व्यवस्थापन विभागातील सफाई कामगारांना महापालिकेच्या वतीने रेनकोट, छत्र्या व हँन्ड ग्लोज, गम बुट पुरविले जातात. यंदा मात्र पावसाळ्याला सुरुवात झाली तरी सफाई कर्मचार्‍यांना सुविधा पुरविल्या जात नसल्याने सफाई कर्मचर्‍यांना आपला जीव धोक्यात घालून काम करण्याची नामुष्की ओढवल्याने सफाई कर्मचारी वर्गात नाराजी पसरली आहे.

कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच्या घनकचरा विभागात शहरातील कचरा उचालण्याच्या कामासाठी, रस्त्याची साफ सफाई, गटार साफ करणे आदी कामासाठी सुमारे 1450 सफाई कर्मचारी असून यामध्ये 971 पुरुष तर 479 महिला कर्मचारी कार्यरत आहेत. पालिका क्षेत्रातील दहा प्रभागातील विविध ठिकाणी सफाई कर्मचार्‍यांच्या /…7

50 हजेरी शेड असून एका हजेरी शेड वर 30 ते 40 सफाई कर्मचारी असतात तर स्टेशन परिसरातील हजेरी शेड वर 50 ते 60 सफाई कर्मचारी काम करीत असतात. सफाई कर्मचार्‍यांच्या कामावर 80 मुकादम, 50 स्वछता निरीक्षक व 10 स्वछता अधिकारी नियंत्रण व देखरेखीसाठी तैनात केलेले आहेत. या सफाई कर्मचार्‍यांच्या मार्फत शहरातील कचरा संकलन, रस्त्याची साफसफाई, छोटे नाले, गटारांची साफसफाई केली जाते या मध्ये बदली, रोजंदारी, झाडूवाले, गटार बिगारी, तसेच पालिकेच्या कायमस्वरूपी सफाई कर्मचार्‍यांना समावेश असल्याची माहिती सूत्रांच्या कडून मिळाली आहे.

महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या या सफाई कर्मचार्‍यांना भांडार विभागा कडून दोन वर्षातून आलटून पालटून पावसाळ्यात रेनकोट, छत्र्या तर दरवर्षी पावसात काम करण्यासाठी हँन्ड ग्लोज, गम बुट व पुरविले जातात यंदा मात्र पावसाळा सुरू झाला तरी पालिकेच्या सफाई कर्मचारी वर्गाला अद्यापही महापालिका प्रशासनाने नेत्याच्या सुविधा पुरविल्या नसल्याने त्यांना हाताने घाण साफ करण्याची नामुष्की ओढवत आहे. कचर्‍याच्या घाणीचे काम करणार्‍या कर्मचार्याच्या आरोग्याची सर्वस्वी जबाबदारी पालिका प्रशासनाची असते त्याच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी तोंडाला मास्क, घाणीने माखलेले हाथ धुण्यासाठी साबण, टॉवेल पुरविणे गरजेचे आहे.

SCROLL FOR NEXT