ठाणे

संजय राऊतांना मनोरुग्णालयात आणावे लागेल : नरेश म्हस्के

दिनेश चोरगे

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : खासदार संजय राऊत हे जेलमधून सुटल्यापासून वायफळ गप्पा मारत आहेत. त्यांची मानसिक स्थिती बिघडली आहे. माझ्या प्रभागामध्ये मेंटल हॉस्पिटल आहे, कदाचित तिथे त्यांना काही दिवसांत आणावं लागेल, अशी जोरदार टीका शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के यांनी सोमवारी केली.

छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते, असे आक्षेपार्ह विधान करणार्‍यांचा निषेधही शिवसेना आणि संजय राऊत यांच्याकडून केला जात नाही. याचा अर्थ संजय राऊत आणि सेनेची ही मंडळी राष्ट्रवादीची धुणीभांडी करतात, असे आम्ही म्हणायचे का?, असा सवाल त्यांनी केला.  शिंदे गटाचे आमदार भाजपची धुणीभांडी करतात का? अशी टीका संजय राऊत यांनी केली होती. त्याला सडेतोड उत्तर शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी दिले आहे. राऊत यांना मनोरुग्णालयात दाखल करण्याची गरज आहे, असा टोला त्यांनी लगावला.

SCROLL FOR NEXT