ठाणे

श्‍वास कसा घ्यायचा हे सुध्दा तुम्हीच सांगणार का? : माजी मंत्री जितेंद्र आव्हाड

दिनेश चोरगे

ठाणे; पुढारी वृत्तसेवा :  राज्याचे वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शासकीय कार्यलयात बोलताना हॅलो नाहीतर वंदे मातरम बोलावे असे म्हटले नसून तसा आदेशच काढला आहे. जर आम्ही तसे म्हटले नाहीतर तुम्ही जेलमध्ये टाकणार की पोलिसांमार्फत केस करणार
असा सवाल राष्ट्रवादीचे आमदार तथा माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला. कोणावरही अशी जबरदस्ती करु नका, देशाला स्वांतत्र्य
मिळाले ते मोकळा श्वास घेण्यासाठी श्वास कुठून कसा घ्यावा हे सुध्दा तुम्हीच ठरवणार का? असा सवालही त्यांनी केला. तर, मिठावर लावलेल्या कराविरोधात लाखो भारतीय रस्त्यावर उतरले होते. हे विसरू नका याची आठवणही त्यांनी करून दिली.

अमृत महोत्सवानिमित्त ठाण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना, त्यांनी भाजपवर टीका केली. मुनगंटीवार यांच्या आदेशाबाबत बोलताना, भारतीय संस्कारात नमस्कार केला जातो. त्या नमस्कारानेच संस्कृतीची सुरूवात होते. कोणी जय भीम बोलतो तर कोणी जय
हिंद करतो. त्यातून भावना व्यक्त होतात, त्या महत्वाच्या आहात. तुम्ही लोकांना जर बोलायची सुरु वात करायची ती कशाने करायची हे तुम्ही ठरविणार का?, मग सुधीर मुनगंटीवार म्हणायचे की सुधीर मुनगंटीवारजी असे म्हणायचे किंवा भाऊ म्हणायचे हे त्यांनी
जाहीर करू टाकावे असेही ते म्हणाले. जोर जबरदस्ती करू नका, देश स्वातंत्र्य झाला आहे. मिळालेले स्वातंत्र्य मोकळा श्वास
घेण्यासाठी आहे. तो कुठून घ्यावा हे ही तुम्हीच ठरवणार का? अशाप्रकारे भारताच्या श्वासाचा गळा गोठण्याचा प्रकार करू नका
असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

आता काय ते जबरदस्तीने म्हणवून घेणार का? आणि बोललो नाही तर ते जेलमध्ये टाकणार का? की पोलिसांकरवी केसेस करणार असा
सवाल करत त्यांना मीठाला लागलेल्या कराविरोधात लाखो लोक रस्त्यावर उतरले होते. याची आठवण देखील त्यांनी करुन दिली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT