File Photo  
ठाणे

लोकलच्या धडकेत एक ठार, दुसरा जखमी

अमृता चौगुले

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा :  कोपर-डोंबिवली स्थानकांदरम्यान दुर्दैवी घटना घडली. लोकलच्या दरवाज्याजवळ प्रवास करताना हेडफोन पडल्याने दोघे मित्र कोपर रेल्वे स्थानकात उतरले. पुन्हा डोंबिवलीच्या दिशेने रेल्वे रुळावरून चालत हेडफोन शोधताना दोघांनाही लोकलची धडक बसली. या अपघातात 16 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला, तर त्याचा 17 वर्षीय मित्र जबर जखमी झाला. डोंबिवली लोहमार्ग पोलिस ठाण्यात सदर अपघाताची नोंद करण्यात आली आहे. ही घटना 21 तारखेला रात्री 10 वाजता कोपर ते डोंबिवली रेल्वे स्थानकादरम्यान घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अहमदराजा हैदरअली शेख (16) असे रेल्वे अपघातात मृत्यू पावलेल्या मुलाचे नाव आहे. तर सादिक शेख (17) हा या अपघातातून बचावला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मुंब्जएयात राहणारे हैदरअली, सादिक आणि अन्य दोघे असे चार मित्र कल्याणहून मलंगगडावर गेले होते. तेथून चौघे मित्र मुंब्जएयाला जाण्यासाठी कल्याण रेल्वे स्थानकात लोकलमध्ये चढले. चौघेही रेल्वेच्या दरवाज्याजवळ उभे राहून प्रवास करत होते.

लोकलने डोंबिवली रेल्वे स्थानक सोडल्यावर हैदरअलीचा हेडफोन रेल्वे रुळावर पडले. हेडफोन घेण्यासाठी हैदरअली व सादिक कोपर रेल्वे स्थानकात उतरले. तर त्यांचे दोन मित्र कोपरला न उतरता पुढे मुंब्जएयाकडे गेले. हैदरअली आणि सादिक हे कोपरे रेल्वे स्थानकात उतरून हेडफोन शोधत रुळवरून डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या दिशेने चालत निघाले. हेडफोन शोधण्याच्या नादात हे दोघे मित्र इतके मग्न झाले होते की त्यांना समोरून मुंबईच्या दिशेने येणारी भरधाव वेगात येणारी अंबरनाथ लोकल दिसली नाही. या लोकलच्या जोरदार धडकेत हैदरअली जागीच ठार झाला. तर त्याचा सादिक याच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याने त्याला तात्काळ केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती अधिकच गंभीर झाल्याने त्याला कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT