ठाणे

रेल्वेप्रवाशाची सोन्याने भरलेली बॅग चोरीला

backup backup

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : हैद्राबाद एक्सप्रेसमधून अंबरनाथला जाणाऱ्या एका प्रवाशाची सोन्याने भरलेली बॅग चोरांनी लंपास केल्याची घटना घडली. तब्बल 23 लाख रुपयांचा हा सोन्याचा ऐवज असल्याची माहिती तक्रारदाराने दिली. यातील संशयित आरोपीस गुजरात येथे कल्याण रेल्वेमधून अटक केली आहे.

श्रीराम सूर्यप्रसाद एळूरीपटी असे तक्रारदार व्यक्तीचे नाव आहे. ही व्यक्ती त्याच्या मुलीचे दागिने घेऊन हैद्राबाद एक्स्प्रेसने प्रवास करत होता. अंबरनाथला जायचे असल्याने तो उल्हासनगर स्थानकावर येताच गाडीची गती कमी झाल्याचे पाहून खाली उतरला. मात्र यावेळी तो 44 तोळे सोन्याने भरलेली बॅग गाडीतच विसरले. त्यानंतर बॅग विसरल्याचे लक्षात येताच त्यांनी रेल्वे पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि गाडीत बॅग विसरल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी या घटनेचा अधिक तपास सुरू केला. मात्र सर्व स्थानकातील सीसीटिव्ही कॅमेरे त्यांनी तपासून पाहिले. यावेळी एक व्क्ती बॅग घेऊन जाताना त्यांना आढळून आला.

आरोपी संशयित व्यक्ती अहमदाबाद येथील रहिवाशी असल्याचे निष्पन्न झाले. वरिष्ठांचे आदेशान्वये विशेष कृती दलाचे (STF) पथक हे अहमदाबाद (गुजरात) येथे रवाना झाले. त्यांनी संशयित आरोपीचा शोध घेवून तपास केला असता, नमुद संशयित व्यक्ती मीळ आला. त्याच्याकडे गुन्हयाचे अनुषंगाने कौशल्यपूर्ण तपास केला असता, त्यांने गुन्हा केलेबाबत कबुली देवुन वरील वर्णनाची 44 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व किलो ४७७ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागीने असा एकुण 23,55,900/- रुपये किमतीचा मुद्देमाल असलेली ट्रॉली बॅग हजर केली.

लोहमार्ग मुंबईचे पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे, पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन कदम,वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे , पोलीस निरीक्षक अरशुददीन शेख यांनी आणि सहक्र्यानी या गुन्ह्याचा कसोशीने तपास केला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT