ठाणे

ठाणे : राज्य सांस्कृतिक पुरस्कारांच्या वितरणाला मुहूर्त मिळाला

दिनेश चोरगे

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या राज्य सांस्कृतिक पुरस्कारांचे वितरण गेल्या दोन वर्षापासून रखडले होते. २०२० व २०२१ या वर्षांच्या सांस्कृतिक पुरस्कारांचे वितरण येत्या १० एप्रिल रोजी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीत सांय. ६.३० वाजता होणार आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी असतील.

२०२० – २०२१ च्या पुरस्काराचे मानकरी असे नाटक –  कुमार सोहनी, गंगाराम गवाणकर, कंठसंगीत पंडितकुमार सुरूशे, कल्याण गायकवाड, उपशास्त्रीय संगीत – शौनक अभिषेकी, देवकी पंडित, चित्रपट मधु कांबीकर, वसंत इंगळे, कीर्तन – ज्ञानेश्वर वाबळे, गुरूबाबा औसेकर, शाहिरी अवधूत – विभुते, कै. कृष्णकांत जाधव, नृत्य – शुभदा वराडकर, , जयश्री राजगोपालन, कलादान अन्वर कुरेशी, देवेंद्र दोडके, – वाद्यसंगीत – सुभाष खरोटे, ओंकार गुलवडी, तमाशा – शिवाजी थोरात, सुरेश काळे, लोककला – सरला नांदुरेकर, कमलबाई शिंदे, अदिवासी गिरीजन मोहन मेश्राम, गणपत मसगे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT