ठाणे

भाजी विक्रीच्या वादातून फ्री स्टाईल

सोनाली जाधव

डोंबिवली : टोमॅटो/भाजी विक्रीच्या वादातून दोघा विक्रेत्यांच्या गटात तुफान फ्री स्टाईल हाणामारी झाल्याची घटना कल्याण पूर्वेकडे शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत. उमेश सोनकर (21), त्याचा भाऊ कैलास सोनकर आणि अविनाश गुप्ता (26) अशी गुन्हा दाखल झालेल्या फ्री स्टाईल भाजीविक्रेत्यांची नावे आहेत. अविनाश गुप्ता आणि उमेश सोनकर दोघेही विठ्ठलवाडी पूर्वेकडील रेल्वे स्टेशन समोरच्या मुख्य रस्त्यावर भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. शनिवारी रात्री दहाच्या सुमारास अविनाश हा टोमॅटो विक्री करत होता. त्यावेळी उमेश सोनकर याने अविनाश गुप्ता याला तू टोमॅटो विक्री करून नको, तू केवळ भाजी विक्री कर, असे सांगून वाद घातला. हा वाद वाढत गेला. या वादातून दोघे एकमेकांवर तुटून पडले. हे पाहून उमेशचा भाऊ कैलासहीमधे पडला. त्यानंतर मात्र तिघांमध्ये फ्री स्टाईलने तूफान हाणामारी झाली. या हाणामारीवेळी दोन्ही गटांनी एकमेकांची लोखंडी वजन-काट्यांनी डोकी फोडली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT